लासुर्णेत पोलिसांच्या कारवाईला आव्हान? छापा पडलेल्या ठिकाणी पुन्हा जुगार अड्डा; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


लासुर्णेत पोलिसांच्या कारवाईला आव्हान? छापा पडलेल्या ठिकाणी पुन्हा जुगार अड्डा; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

लासुर्णे : काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मोठा गाजावाजा करत ज्या ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकला, त्याच ठिकाणी पुन्हा जुगाराचा अड्डा जोमाने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईनंतरही जुगाराचा अड्डा पुन्हा सुरू होतोच कसा? असा संतप्त सवाल लासुर्णे परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

यापूर्वी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले होते. रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या कारवाईला काही दिवस उलटत नाहीत तोच त्याच ठिकाणी पुन्हा जुगार सुरू झाल्याचे समोर येत असेल, तर पोलिसांची कारवाई केवळ कागदावरच होती का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Advertisemen

पोलिसांनी छापा टाकल्यानंतर संबंधित ठिकाणी सातत्याने लक्ष ठेवणे अपेक्षित असताना पुन्हा त्याच ठिकाणी जुगार सुरू होणे ही बाब गंभीर मानली जात आहे. पोलिसांच्या कारवाईचा धाक नेमका कुठे गेला? की कारवाईनंतर अड्डा पुन्हा सुरू होण्यासाठी कोणाचे अप्रत्यक्ष पाठबळ मिळत आहे? या प्रश्नांची उत्तरे पोलिस प्रशासनाने नागरिकांना देणे गरजेचे आहे.

एका बाजूला जुगार अड्ड्यांवर कारवाई केल्याचा दावा केला जातो, तर दुसऱ्या बाजूला त्याच ठिकाणी पुन्हा जुगार सुरू होत असेल, तर ही पोलिसांच्या कार्यक्षमतेची परीक्षा आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी आणि संबंधित ठिकाणी पुन्हा जुगार सुरू होण्यामागे कोण आहे, याचा तपास करावा.

छापा पडला, गुन्हा दाखल झाला; मग पुन्हा जुगार सुरू कसा झाला?
लासुर्णेकरांच्या या प्रश्नाचे उत्तर आता पोलिस प्रशासन देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »