मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण संपन्न


बारामती, दि. २२: महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाच्या नियोजनानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना कवी मोरोपंत सभागृह येथे आज प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, निवासी नायब तहसीलदार विलास करे आदी उपस्थित होते.

Advertisemen

तहसीलदार श्री. शिंदे म्हणाले, मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम २३ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत पूर्ण करावे. सर्वेक्षण करताना नागरिकांची तोंडी माहितीच्या आधारे ॲपवर माहिती भरावी. सर्वेक्षण कालावधीत आपल्या गावात आलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले.

सदरचे प्रशिक्षण दोन सत्रात देण्यात आले. प्रशिक्षक जालिंदर बालगुडे आणि सचिन बारवकर यांनी तालुक्यासाठी नियुक्त केलेल्या १७ पर्यवेक्षक व ५०० प्रगणकांना मार्गदर्शन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »