बारामतीत बनावट सिगारेट साठ्यावर कारवाई; ₹11.32 लाखांचा मुद्देमाल जप्त


बारामतीत बनावट सिगारेट साठ्यावर कारवाई; ₹11.32 लाखांचा मुद्देमाल जप्त

बारामती, दि. ३० : बारामती शहर पोलिसांनी कॉपीराइट कायद्यांतर्गत मोठी कारवाई करत बनावट ब्रँडच्या सिगारेटचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत अंदाजे ₹11.32 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी बौद्धिक संपदा (IPR) संरक्षण संस्थेला संबंधित कंपनीच्या बनावट उत्पादनांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. गुप्त माहितीच्या आधारे श्रीराम नगर परिसरात छापा टाकण्यात आला. तेथे एका पिकअप वाहनातून संशयित बनावट ब्रँडच्या सिगारेटचा साठा आढळून आला. तपासणीदरम्यान अनेक पॅकेट्सवरील क्रमांक एकसारखे असल्याने तो बनावट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

Advertisemen

या कारवाईत सुमारे ₹6.82 लाख किमतीच्या विविध प्रकारच्या बनावट सिगारेट तसेच ₹4.50 लाख किमतीचे पिकअप वाहन असा एकूण ₹11.32 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी कॉपीराइट अधिनियम, 1957 मधील कलम 51 व 63 अन्वये बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुरवठा साखळी, साठवणूक व विक्रीत सहभागी असलेल्या व्यक्तींचा पुढील तपास सुरू आहे.

पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, बनावट उत्पादनांच्या पुरवठ्यामागील संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »