बारामती तालुका पोलिसांकडून विद्या प्रतिष्ठान कॉलेजमध्ये अंमली पदार्थ जनजागृती अभियान


बारामती : बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या जनजागृती मोहिमेअंतर्गत विद्या प्रतिष्ठान कॉलेज, विद्यानगरी, बारामती येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व सांगत, निरोगी व व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

Advertisemen

यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी अंमली पदार्थांच्या विक्री किंवा बेकायदेशीर व्यवहारांबाबत कोणतीही गोपनीय माहिती असल्यास ती पोलिसांना त्वरित कळवावी, असेही आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अंमली पदार्थमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.

या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक नारायण पवार, विद्या प्रतिष्ठान कॉलेजचे प्राचार्य भारत शिंदे, उपप्राचार्य अंकुश खोत, पोलीस उपनिरीक्षक शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक बगाडे, पोलीस अंमलदार वाकळे, महिला पोलीस अंमलदार पोतेकर तसेच विद्या प्रतिष्ठानच्या ज्योती जगताप, अंकिता चौधर, नाझनीन खान, मुक्ता कडणे यांच्यासह शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »