५८ वर्षीय व्यक्तीवर दोन अल्पवयीन बालिकांवरील लैंगिक गैरवर्तनाचा आरोप; बारामतीत BNS, POCSO व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा


बारामती : चॉकलेट आणि पैशांचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन बालिकांशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात समोर आला आहे. या प्रकरणी ५८ वर्षीय व्यक्तीविरुद्ध बारामती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिकांचे वय अनुक्रमे ५ आणि ८ वर्षे आहे. संशयित आरोपी हा बालिकांच्या घराशेजारी राहत असल्याचे सांगण्यात येत असून, त्याने चॉकलेट व पैशांचे आमिष दाखवून बालिकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

Advertisemen

घटना समोर आल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

याबाबत बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी सांगितले की, दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक गैरवर्तनाच्या प्रकरणी आरोपीविरुद्ध विविध गंभीर कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »