बारामतीत मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकाविरुद्ध बा.न.प तर्फे गुन्हा दाखल


बारामतीत मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकाविरुद्ध बा.न.प तर्फे गुन्हा दाखल

बारामती, दि. २४ जुलै : बारामती शहरात मोकाट जनावरे सोडून नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याप्रकरणी एका जनावरांच्या मालकाविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १०६, ११७ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २२३ व २९१ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Advertisemen

फिर्यादी स्वरूप संजय अहिवळे, आरोग्य विभाग प्रमुख, बारामती नगरपरिषद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नगरपरिषद हद्दीत मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे अस्वच्छता वाढत असून नागरिकांच्या जीवितास तसेच वाहतुकीस धोका निर्माण होत आहे. तसेच नगरपरिषदेने लावलेल्या झाडांचेही नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

तक्रारीनुसार, संबंधित जनावरांच्या मालकाला मागील महिनाभर वारंवार तोंडी सूचना देऊनही २३ जुलै रोजी जळोची रोड, नक्षत्र गार्डन कॉर्नर परिसरात जनावरे मोकाट सोडण्यात आली. त्यामुळे नगरपरिषदेच्या आदेशानुसार संबंधित मालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राजश्री बापुराव आटोळे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »