पानगल्लीत मुंबई मटका जुगारावर पोलिसांचा छापा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


पानगल्लीत मुंबई मटका जुगारावर पोलिसांचा छापा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

बारामती, दि. 20 जुलै : बारामती शहरातील पानगल्ली गणेश भाजी मंडई परिसरात सुरू असलेल्या मुंबई मटका जुगारावर स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 20 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 6:35 वाजता छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान एक व्यक्ती कागदी चिठ्ठ्यांवर आकडे लिहून मुंबई मटका जुगार चालवत असल्याचे आढळून आले. चौकशीत हा जुगार अनिल ओमप्रकाश शर्मा याच्या मालकीचा असून आझाद बाबू शेख हा त्याच्या वतीने जुगार चालवत असल्याचे निष्पन्न झाले.

Advertisemen

या कारवाईत पोलिसांनी ₹1,880 रोख रक्कम, मटका लिहिलेली दोन स्लिप बुक आणि एक बॉलपेन असा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0285/2026 नोंद करण्यात आला असून, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, 1887 च्या कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार यशवंत ज्ञानदेव पवार करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »