महिलांनो आर्थिक पत कायम सांभाळा – सुनंदा पवार


बारामती :  दिनांक 30 जुलै रोजी बाबुर्डी येथे शारदा महिला संघ अंतर्गत समृद्ध महिला अभियान च्या माध्यमातून महिला मार्गदर्शन मेळावा पार पडला, यावेळी सुनंदा पवार म्हणाल्या … महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योजकता,आरोग्य ,शिक्षण, स्वावलंबी, या विषयावरती आम्ही प्रामुख्याने लक्ष देऊन समृद्ध महिला अभियानांतर्गत प्रभाविपणे काम करीत आहोत ,गावोगावी शारदा महिला संघाच्या माध्यमातून बारामती, इंदापूर ,पुरंदर, दौंड, या चार तालुक्यातील जवळपास 17000 महिला जोडलेले आहेत व अजून ही जोडणी चालू आहे या 17000 महिलांमध्ये जाणीव जागृती करण्यासाठी ,स्वावलंबी सक्षम बनवण्यासाठी शारदा महिला संघाच्या माध्यमातून त्यांना विविध प्रशिक्षण देऊन अर्थसहाय्य उपलब्ध करून त्यांचे उद्योग व्यवसाय उभा करून भीमथडी, कृषी प्रदर्शन ,धान्य महोत्सव या ठिकाणी आम्ही संधी देत आहोत.
महिला मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना सुनंदा पवार म्हणाल्या की बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक व्यवहार व पथ चांगल्या पद्धतीने निर्माण केली आहे ती कायम सांभाळावी त्यामुळे आपल्याला विविध उद्योग व्यवसायासाठी बँका ,पतसंस्था सहकार्य करण्यास तयार असतात महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून कुटुंबाच्या प्रगतीसाठी काही ना काही तिच्या कलागुणांना संधी देऊन आवडीनुसार उद्योग व्यवसायाची निवड करावी व त्याच्यामध्ये मन लावून काम केल्यास निश्चित यश मिळते ,अनेक महिला हल्लीच्या काळामध्ये मोबाईल मध्ये जास्तीत जास्त व्यस्त आहेत असे दिसून येते परंतु मोबाईलचे काही दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतात त्यामुळे त्याचीही काळजी आपण घेतली पाहिजे मोबाईल पेक्षा आपली कुटुंब महत्त्वाचे आहे व आपल्या कुटुंबाच्या विकासासाठी आपल्या कलागुणांना वाव देऊन कुटुंबाच्या प्रगतीकडे लक्ष दिले पाहिजे ,आपल्या मुलाबाळांना योग्य पद्धतीने चांगले संस्कार दिल्यास चांगल्या पद्धतीने कुटुंब राहत असते व प्रगतीच्या दिशेने कुटुंबाची वाटचाल होत असते ,हे युग स्पर्धेचे आहे स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला टिकून राहायचे आहे यामुळे नवनवीन संधी आपण शोधून महिलांनी उद्योग व्यवसाय निर्मिती केली पाहिजे असे माझे मत आहे.

Advertisemen

सविताताई व्होरा ...

सामाजिक कार्यकर्त्या सविता व्होरा म्हणाले की महिलांनी कुटुंब सांभाळत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे आपल्या स्वतःचे आरोग्य चांगले असेल तर आपली पाहिलेली स्वप्न आपण पूर्ण करू शकतो , महिलांनी जे काही करायचे आहे ते कुटुंब सांभाळून करावे कुटुंबासाठीच उर्वरित मिळालेल्या वेळामध्ये कुटुंबाच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या उद्योग व्यवसायाची माहिती घेऊन त्यावरती लक्ष केंद्रित केले पाहिजे .

संत कृपा महिला गृह उद्योगाचे प्रमुख
विशाल सोळसकर …..
यावेळी म्हणाले की महिलांनी बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू फक्त प्रदर्शनापुरतेच न बनवता व न विकता बाराही महिने त्यांनी मार्केटचा अभ्यास केला पाहिजे व बारा महिने हाताला रोजगार मिळण्यासाठी बनवलेल्या वस्तूंच्या विक्री कडे लक्ष दिले पाहिजे ,
आपण बनवलेली उत्पादने त्याची गुणवत्ता सांभाळणे फार महत्त्वाचे आहे ,

यावेळी आदित्य बिर्ला ट्रस्टचे सोशल विभागाच्या पूजा गुंजाळ यांनी महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत सदस्य रूपाली लडकत यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब नगरे यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन सचिन लडकत,प्रकाश साळुंखे , गजानन मोकाशी ,सीमा पानसरे ,अभिषेक जगताप , राहुल चव्हाण, तात्या शेलार यांनी सूत्रसंचालन केले , यावेळी बचत गटांना अर्थसहाय्य मंजुरी पत्र देण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »