संपादकीय : बारामती इंदापूर दौंड तालुक्यातील मान्सूनपूर्व उपाययोजनांची अब्रूची लक्तरे संयोगच्या वेशीवर


संपादकीय

महाराष्ट्रातील मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने बारामती इंदापूर दौंड या तालुक्यांना अक्षरशः जोडपून काढले. बारामती इंदापूर दौंड तालुक्याचा प्रशासनाने केलेले पावसाच्या उपाययोजना मुळे सर्वसामान्य माणसांना हाल सहन करावा लागला गटारी नदी नाले ओढे तुंबणार आहेत अतिरिक्त पाऊस झाला तर त्याचे नियोजन कसे करावं याचे कायद्यामध्ये व प्रशासनामध्ये प्रशिक्षण नियोजन दिले जाते व केले जाते.

Advertisemen

पुणे जिल्हा हा पिढ्यांना पिढ्या पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला आहे असे असतानाही पुणे जिल्ह्याचे मान्सूनपूर्व कामांची नियोजनपूर्व बैठक झालेले नाही हे पुणे जिल्ह्याचे दुर्दैव पुणे जिल्ह्यात व प्रामुख्याने बारामती इंदापूर दौंड तालुक्यात मान्सून पूर्व च्या कामाचे कुठलेही नियोजन पैसे खर्च झाले असतील पुणे सोलापूर हायवे बंद पडला ओढे नाल्यांना पूर आला गावातली शहरातली गटारं तुंबली झोपडपट्टीतून सकल भागातून मलमिश्रित पाण्याचं साम्राज्य घरादारात कित्येक झोपडपट्ट्यांमध्ये सकल भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना ही गुघाण सहन करावी लागली प्रशासनाच्या व सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे गरीब माणसांच्या घरांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले हे मात्र खरं रस्त्यावर चार चार पाच पाच तास वाहतूक कोंडी झाली अनेक रुग्णांना याच्या अकार क्षमतेमुळे त्रास सहन करावा लागला कृषी महसूल सार्वजनिक बांधकाम नगरपालिका ग्रामपंचायता यांनी ओढे नाले रस्ते नैसर्गिक पाणी व्यवस्थापन सर्व व्यवस्थांवर अनैसर्गिक अतिक्रमण करून विकासाच्या नावाखाली मतांच्या अपेक्षेने आर्थिक गैरव्यवहारातून निसर्गचक्र बिघडून टाकले कित्येक संसार उघड्यावर पडले शेती वाहून गेली घर पडली पशुधन अन्नधान्य बरबाद झाले एवढं सारं मान्सूनपूर्व काम न केल्यामुळे सर्वसामान्यांना भोगाव लागलं आता मंत्री संत्री, जंत्री पूरग्रस्तांच्या गावोगावी फिरतील समाज माध्यमांतून वहा दादा जाणते साहेब संसद रत्न माननीय ताईंची सहानुभूती पाकिटा मधनं थंडगार अन्न उसळणाऱ्या रक्तातला थंडगार करतील समाज माध्यमातून जिवंत येणारी लोकं कुचेष्टा म्हणून फुल कोसळताना घरात पाणी शिरताना पाण्यावर विष्ठा तरंगताना दोन बाचकी रेशनच्या गव्हाची भिझलेली जिवंतपणे समाज माध्यमांना दाखवतील वर्षानुवर्ष गढूळ पाणी पिणारी माणसं बाटलीत पाणी प्यात्याल ताई दादा साहेब तात्या मामा काका यांचे सच्चा माणूस दिलदार माणूस प्रेमाची पाखरं विकासपुरुष सर्वज्ञ राजकारणी पन्नास शंभर वर्षाचं नियोजन विकासाची विकसित अशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय उपमा देऊन पूरग्रस्त पीडीतांसमोर या नेत्यांना दैवत्व बहाल करतील पण या पावसाच्या पाण्यामुळे लोकांच्या गैरसोयीबद्दल लोकांचे झालेले हाल व त्यास असलेले जबाबदार राजकारणी व प्रशासक यांच्या फोटोला जोडे मारायचे धाडस करणार नाही तीन दिवस झाले भुकेने व्याकुळ आहे माझ्या वस्तीत लाईट नाही त्यामुळे पाणी भी नाही आणि पीठ भी नाही या उपाशी तपाशी पीडितांचा नेता भीक मागताना जिवंत माध्यमांतून लोकांना स्वतःची ओळख करून देत आहे आणि एक वेळंच्या जेवणाच्या थंडगार पाकिटावर बेहद खुश होऊन उद्या मुंडक्याचे भले मोठे आभार प्रदर्शनाच्या जाहिरात गल्लीबोळात लावतो ज्या च्या नाकर्त्यापणामुळे ही दुर्वस्था झाली आहे त्याबद्दल जाब विचारायचा सोडून गोरगरिबांच्या पोटाचे राजकारण करून ग्रामपंचायत पासून दिल्लीपर्यंत या नीच प्रवृत्ती आपल्या कामात कसुराई करतात लोकांच्या अव्यवस्था देताना दुःख व्यथा यांचे भांडवल करून हे राजकारण करणाऱ्यांच्या प्रवृत्तींना व त्याला साथ देणाऱ्या प्रशासना ला हे का घडते आणि केव्हापर्यंत घडणार याचा जाब कोणीतरी स्वप्नात तरी विचारा अन्यथा लोकशाहीचे मढं आवळून एखाद्या पावसाच्या पाण्यात सोडून तरी द्यावं म्हणजे आपले हक्क आणि अधिकारांबद्दल पुन्हा स्वप्न पडणार नाही


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »