आध्यात्मिक व्यासपीठावर पोहोचला सायबर सुरक्षेचा संदेश; ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती


आध्यात्मिक व्यासपीठावर पोहोचला सायबर सुरक्षेचा संदेश; ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती

जळगाव : आध्यात्मिक वातावरणाला डिजिटल सुरक्षेची जोड देत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, जळगाव येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसह उपस्थितांना ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.

सोमनाथ वडनेर यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाला मीनाक्षी दीदी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी Quick Heal Foundationच्या Cyber Warrior उपक्रमातील साक्षी पाटील, विद्या सोनवणे, अक्षय पाटील आणि लोकेश पाटील यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

Advertisemen

ऑनलाइन फसवणूक, OTP, Phishing, Fake Links, Password Security तसेच Social Media Safety यांसारख्या विषयांवर सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. डिजिटल व्यवहार करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, संशयास्पद लिंक किंवा संदेश ओळखावा कसा आणि ऑनलाइन फसवणूक झाल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत, याबाबत Cyber Warriors यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान काही उपस्थितांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवांबाबत तसेच यापूर्वी घडलेल्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांबाबत प्रश्न उपस्थित केले. Cyber Warriors यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करत भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी सांगितली.

विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना अधिक सतर्क राहावे, OTP, PIN, पासवर्ड, बँक खात्याची माहिती किंवा इतर गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन करण्यात आले.

आध्यात्मिक व्यासपीठाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचविणाऱ्या या उपक्रमामुळे डिजिटल व्यवहारांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास मदत झाली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »