राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे, युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे; सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान


राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे, युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे; सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

मुंबई, दि. ५ ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या हस्ते देवगिरी बंगल्यावर दोन्ही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

Advertisemen

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर वैशाली नागवडे आणि निखिल ठाकरे यांनी प्रदेश कार्यालयात जाऊन दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेसमोर नियुक्तीपत्र अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण, कार्यालयीन सचिव संजय तटकरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या नियुक्त्यांमुळे महिला व युवक संघटनांना अधिक बळ मिळणार असून आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याची भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »