चार वर्षांपासून फरार असलेला मोका गुन्ह्यातील आरोपी बारामतीत जेरबंद


चार वर्षांपासून फरार असलेला मोका गुन्ह्यातील आरोपी बारामतीत जेरबंद

बारामती, दि. 18 : बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोका गुन्ह्यातील चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

बारामती तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 563/2022 मध्ये भारतीय दंड विधान कलम 307, 120(ब), 201, 143 तसेच आर्म्स अॅक्ट कलम 2 व 25 अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी सोनू उर्फ ओंकार संजय जाधव (रा. कळंब, ता. इंदापूर, जि. पुणे) हा गुन्हा घडल्यानंतर फरार होता.

गोपनीय बातमीदारामार्फत संबंधित आरोपी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एमआयडीसी परिसरात सापळा रचून शोधमोहीम राबविली. यावेळी सोनू उर्फ ओंकार संजय जाधव हा पोलिसांच्या ताब्यात मिळून आल्याने त्याला अटक करण्यात आली.

Advertisemen

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती सुदर्शन राठोड आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या पथकात ग्रेड पोलीस उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, पोलीस हवालदार खारतोडे, एकसिंगे, आप्पा दराडे, पोलीस शिपाई निलेश वाकळे आणि मनोज पवार यांनी सहभाग घेत ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली.

बारामती संचार | लोकहिताचा विचार


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »