मे. धोत्रे मटका फर्म जाहीर प्रगटन
बारामती– बारामती मध्ये यशवंतराव चव्हाण उद्योग भवन समोर धोंडीबा आबा सातव उद्योग भवन नगरपरिषद इमारत शेजारी देशी दारूच्या गुत्याला लागून धोत्रे मटका फर्म चालू झाली आहे. विनम्र सेवा, तात्काळ पेमेंट तक्त्याची वाट पाहत नाही. कुशल विक्रेते लेखक किमान सकाळी कल्याणचा व्यवसाय अडीच ते तीन लाख रुपये तर मुंबई चार ते पाच लाख रुपये निव्वळ कमिशन किमान 70 हजार रुपये प्रतिदिन असा अतिशय प्रतिष्ठेचा व्यवसाय मे. धोत्रे मटका फर्म हे गेले कित्येक वर्ष ग्राहकांच्या विश्वासावर आणि प्रशासनाच्या आशीर्वादाने तर गावगुंडांच्या सहकार्याने पंधराव्या वर्षात पदार्पण करीत आहोत. बारामती शहर व परिसरात अनेक शाखा कार्यरत असून या शाखेचाही व्यवसाय अतिशय उत्तम रीतीने चालत असून आता नवीन शाखेच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. तरी कोणास रीतसर परवानगी हवी असल्यास फर्म चे मालक गन – पती धोत्रे यांना प्रत्यक्ष भेटून आपले कौशल्य प्रमाणपत्र पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन प्रत्यक्ष भेटावे. आपले व आपल्या कुटुंबाचे भरभराट करावे समाजाला भिकेला लावावे लुटमारी हे आमच्या व्यवसायाचे ब्रीद असून या ब्रीद प्रमाणे आम्ही आमच्या शाखा चालकांना कायदेशीर बेकायदेशीर संरक्षण देण्याची हमी देत आहोत. व्यवसायाची हमी किंमती भरमसाठ आमच्या नवीन शाखेच्या वितरणाच्या इच्छुकांनी संपर्क करावा
आपला
धोत्रे मटका फर्म
कदम चौक शेजारी

