अतिक्रमण विभाग प्रमुखावर कारवाई करण्याची मागणी
बारामती– बारामती नगरपरिषद हद्दीतील पोस्टर जाहिरात बंदीच्या सर्वसाधारण ठरावाला आज काळिंबा फासण्यात आला आहे. बारामती नगरपरिषद हद्दीत विद्रुपीकरण करणाऱ्या विरोधात अतिक्रमण विभागाने कारवाई केली नाही उलट पक्षी विद्रुपीकरण करणाऱ्या व्यक्ती संस्थांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. बारामती तालुक्याचे लाडके नेते विकासपुरुष आमदार माननीय अजित दादा पवार यांच्या आदेशानुसार बारामती नगरपरिषद हद्दीत पोस्टर व जाहिराती बंद सर्वसाधारण सभेचा ठराव करण्यात आला आहे. असे असतानाही संपूर्ण बारामती विद्रूपीकरण करून माननीय अजितदादांच्या आदेशाची कुचेष्टा केली जात आहे. याबाबत लोकांमध्ये तीव्र नाराजी असून बारामती नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभाग प्रमुखावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.