चारचाकी वाहनासाठी ‘एमएच ४२ बीएन’ क्रमांकाची नवीन मालिका


बारामती, दि.१: खाजगी संवर्गातील चारचाकी वाहनांसाठी बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे ‘एमएच ४२ बीएन’ क्रमांकाची नवीन मालिका सुरु करण्यात येणार असून आकर्षक क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या खाजगी चारचाकी वाहनांसाठी आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी ४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेच्यादरम्यान धनाकर्षासह (डी.डी.) विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल.

Advertisemen

यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा डी.डी. जमा करावयाचा असेल त्यांनी ५ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेपर्यत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता संबंधित अर्जदारांसमोर लिफाफे उघडून विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा धनाकर्ष भरलेल्या व्यक्तीस नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.

अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, छायाचित्र ओळखपत्र तसेच पॅनकार्डची स्वाक्षांकित प्रत आणि ‘डीवाय. आर.टी.ओ., बारामती’या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा बारामती येथील धनाकर्ष असावा.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. सदर वाहन ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी सादर न केल्यास राखून ठेवलेला क्रमांक आपोआप रद्द होण्यासह भरलेले शुल्क शासनजमा होईल. नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नसल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी कळविले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »