बारामतीत ‘टायटॅनिक’चा थरार; ऐतिहासिक अनुभव देणारे भव्य प्रदर्शन
बारामतीत ‘टायटॅनिक’चा थरार; ऐतिहासिक अनुभव देणारे भव्य प्रदर्शन
बारामती, दि. १८ जुलै : बारामतीमध्ये प्रथमच भव्य ‘टायटॅनिक एक्स्पिरियन्स’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांना इतिहासाचा रोमांचक अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. “चला, इतिहासाचा अनुभव घ्या… दंतकथेचा अनुभव घ्या!” या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.
प्रदर्शनामध्ये १४ एप्रिल १९१२ रोजी बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचा इतिहास, त्यासंबंधी माहिती आणि विविध आकर्षक देखावे साकारण्यात आले आहेत. याशिवाय रोमांचक राईड्स, शॉपिंग झोन, फूड कोर्ट, ॲम्युझमेंट पार्क, सेल्फी पॉइंट तसेच इतिहासाशी संबंधित अनेक दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे.
लहान मुलांसाठी विशेष आकर्षण म्हणून जायंट व्हील, कोलंबस, भूत बंगला, ब्रेक डान्स, ड्रॅगन ट्रेन, जंपिंग, मिनी ट्रेन यांसारख्या विविध मनोरंजनात्मक राईड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कुटुंबांसाठी कुल्फी, आईस्क्रीम, पाणीपुरी, चाट, वडापाव, कॉर्न, कॉटन कँडी, मिरची भजी अशा विविध खाद्यपदार्थांचे स्टॉलही उपलब्ध आहेत.
आयोजकांच्या माहितीनुसार, हे प्रदर्शन केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून इतिहास, ज्ञान आणि आठवणींचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. कुटुंब, मित्रपरिवार आणि पर्यटकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन अविस्मरणीय अनुभव घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे प्रदर्शन भिगवण रोड, बारामती येथे क्रोमा शोरूमजवळ, स्वातंत्र्य सैनिक संभाजीराव गालिंदे नगर, सहयोग सोसायटी समोर आयोजित करण्यात आले आहे.


