बारामती नगर परिषदेचा १६१ वा वर्धापन दिन सोहळा उद्या; विविध कार्यक्रमांचे आयोजन
बारामती: बारामती नगर परिषद आपल्या गौरवशाली परंपरेचा नवा टप्पा गाठत असून, उद्या गुरुवार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी नगर परिषद १६१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या ऐतिहासिक वर्धापन दिनानिमित्त नगर परिषद प्रशासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नगर परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, वर्धापन दिनाचे औचित्य साधून उद्या सायंकाळी ५ ते ७ या वेळेत नगर परिषद कार्यालय परिसरात ‘चहापान समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यासाठी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका, तसेच नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिक आणि हितचिंतकांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात आले आहे.
‘स्वच्छ बारामती, सुंदर बारामती आणि हरित बारामती’ हा संकल्प अधिक दृढ करत नगर परिषद आपला हा वर्धापन दिन साजरा करत आहे.


