भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली मार्फ़त अखिल भारतीय समन्वित मधमाशी व परागीभवन कीटक संशोधन प्रकल्पाचे कृषि विद्यान केंद्र बारामती येथे पंचवार्षिक पुनरावलोकन


बारामती : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली मार्फ़त अखिल भारतीय समन्वित मधमाशी व परागीभवन कीटक संशोधन प्रकल्प या विषयावर भारतामधील २५ राज्यामध्ये प्रकल्प राबवण्यात येतो. यासाठी अखिल भारतीय अनुसंधान परिषद, नवी दिल्ली मार्फत सहा शास्त्रज्ञांची समिती गठन करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने दिनांक २ ते ३ सप्टेंबर, २०२४ रोजी भारतामधील पश्चिम विभागातील पाच राज्यांची पंचवार्षिक पुनरावलोकन टीम मीटिंग कृषि विज्ञान केंद्र, बारामती आयोजित करण्यात आली होती.
या मध्ये इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ, रायपुरचे राजमोहिनीदेवी कृषि संशोधन केंद्र, अंबिकापूर, छत्तीसगड, कृषी विद्यापीठ व कृषी संशोधन केंद्र उम्मेदगा कोटा राजस्थान, नवसारी कृषी विद्यापीठ, गुजरात, बांदा कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ उत्तर प्रदेश व कृषि विद्यान केंद्र, बारामती या केंद्रांनी सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे चेअरमन डॉ. एच. सी. शर्मा, माजी कुलगुरू, डॉ वाय.एस परमार फलोत्पादन आणि वनीकरण विद्यापीठ, सोलन, हिमाचल प्रदेश यांनी मधमाशीचे पिक उत्पादनमध्ये असलेले महत्व सांगून भविष्यातील संधी याविषयी मार्गदर्शन केले.
समिती सदस्य डॉ. राजकुमार ठाकूर, माजी प्रकल्प समन्वयक, अखिल भारतीय समन्वित मधमाशी व परागीभवन कीटक संशोधन प्रकल्प, नवी दिल्ली यांनी बाहेरील देशामध्ये चाललेले संशोधन व भारतामधील व विदेशातील मधमाशीच्या महत्व पूर्ण गोष्टीवर सभोधन केले. डॉ. डी. पी. अॅब्रोल, माजी डीन, कृषी विद्याशाखा, SKUAST, जम्मु यानी मधमाशीला शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या कीटकनाश, तणनाशके व इतर पर्यावरणीय दुषित पदार्थ यापासून होणारे नुकसान या विषयी मार्गदर्शन केले. डॉ. के. लक्ष्मी राव, माजी सहसंचालक, केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, (CBRTI), पुणे महाराष्ट्र, यांनी भारतामध्ये आढळणाऱ्या विविध वनस्पती त्यापासून मिळणारे पराग व मकरंद, त्याचे मधमाशी पासून मिळणाऱ्या उत्पादनात फायदे व मधमाशी पालन पुष्प दिनदर्शिका (फ्लोरल कॅलेंडर) याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. एम.आर. श्रीनिवासन, माजी मुख्य अन्वेषक, अखिल भारतीय समन्वित मधमाशी व परागीभवन कीटक संशोधन प्रकल्प, तामिळनाडू कृषी विद्यापीठ, कोइम्बतूर, तमिळनाडू, कीटकशास्त्र प्राध्यापक त्यांनी सातेरी मधमाशीमध्ये झालेले संशोधन यावर मार्गदर्शन केले.

Advertisemen


समितीचे सचिव डॉ. सचिन सुरोशे, प्रकल्प समन्वयक, भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प, नवी दिल्ली यानी मधमाशीपासून मिळणारे विविध उत्पादने त्याची जागतिक बाजारपेठ, भारतातील मधमाशीच्या विविध जाती, मधमाशीच्या उत्पन्नाचे अर्थकारण याविषयी मार्गदर्शन केले.
या मीटिंग साठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश नलावडे यांनी सर्व पाहुण्याचे स्वागत केले. व संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाची माहिती उपस्थिताना दिली. या प्रकल्पाचे कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे सादरीकरण डॉ. मिलिंद जोशी, मुख्य अन्वेषक, भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प मधमाशी व परागीभवनकीटक, कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांनी केले.
या कार्यक्रमासाठी यशस्वी नियोजनाकरिता अखिल भारतीय समन्वित मधमाशी व परागीभवन कीटक संशोधन प्रकल्प, शास्त्रज्ञ डॉ. कुमारनाग, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे, प्रकल्प मुख्य अन्वेषक डॉ. मिलिंद जोशी व श्री. अल्पेश वाघ, श्री. प्रशांत गावडे, श्री. आशिष भोसले, श्री. अक्षय कुंभार व श्री. सचिन क्षीरसागर यांचे योगदान लाभले.
यावेळी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन श्री. राजेंद्र पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश नलावडे यांनी मधमाशी संदर्भातील नाविन्यपूर्ण संशोधन व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »