“पवार” माझ्या बारामतीला वाचवा! भाग-१


भारतीय राजकारणाचे चाणक्य जाणते राजे कार्यक्षम राजकारणी सहकार महामेरू शिक्षण प्रवर्तक कृषी संशोधक उद्योजक वैज्ञानिक द्राष्टा शिव शाहू फुले आंबेडकर विचारांचे व आचारांचे पायीक अश्या बहुआयामी पवार कुटुंबियांच्या चरणी सविनय सादर..

 

आदरणीय पवार कुटुंबीय
साष्टांग दंडवत
पत्रास कारण की

बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 जाहीर झाले असून निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली आहे.

तुम्हा पवार कुटुंबीयांच्या राजकीय उदयापासून आजपर्यंत तुमच्या कौटुंबिक त्यागाने परिश्रमाने कष्टाने बारामतीचे नाव जगाच्या राजकारणात विकासात आधाराने घेतले जाते. तुमची दूरदृष्टी तुमचं समाजापरी कर्तव्य भाव त्यामुळे बारामतीकरांना तुमचा सार्थ अभिमान आहे. तुम्ही केलेला आदेश किंवा तुम्ही दिलेला निर्देश सूचना तुम्ही जरी नुसतं खूनवलं तरी आम्ही बारामतीकर देवाज्ञा मानून कार्य सिद्धीस नेहतो.

Advertisemen

पण आज बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या काळात एक फटका दरिद्री मतदार आपणास या पत्राद्वारे अंतकरणापासून विनंती करू इच्छितो की बारामती नगरपरिषद हद्दीमध्ये मानवी मूल्याचं अधिकाराचं दिवसाढवळ्या रात्र अपरात्री हरण चालू आहे. इथल्या बोकावलेल्या गावगुंडांनी सर्वसामान्यांच्या नैसर्गिक अधिकारांवर सशस्त्र हल्ले चढवले आम्ही समजू शकतो. गुंड प्रवृत्तीचे असंस्कृत दोषपूर्ण व्यक्तींबद्दल टोळ्यांबद्दल आम्ही पामर काय बोलणार रस्त्या रस्त्याने कोयते लाट्या काट्या बंदुकी घेऊन फिरणारे हे बेजबाबदार नागरिक जेव्हा कायदा हातात घेऊन येथील शांततेने जगणाऱ्या नागरिकांना त्यांची शांतता भंग करून दहशतीखाली घेऊन भययुक्त जीवन कंठण्यास भाग पाडतात. तेव्हा या बारामतीतील सुज्ञ सुजाण नागरिक आपला जीव मुठीत धरून घरादाराला कड्या कोंड्या लावून जनावरं कोंडावी तशी मुलं बाळं लेकरं बाळं सुनालेकी म्हतारी कोतारी कोंढावड्यात कोंबून पारतंत्र्याचे आयुष्य कंठत आहे आहोत.

अशा गुंड प्रवृत्ती विरुद्ध तुमच्याकडून अपेक्षा करणं जरा गैरच आहे. पण दुर्दैवाने तुम्ही तुमच्या आदेशाने या बारामती नगर परिषदेत व पंचक्रोशीमध्ये तुमच्या विचारांचे मानसपुत्र व कन्या अशा बेलगाम गुंडांना तुम्ही बारामती मध्ये खादीची कपडे घालून पदाचे लेबल लावून गावभर व्हाइट कॉलर क्राईम करण्याच्या खुली सूट दिली आहे काय? या असुरक्षित बारामतीत स्वतंत्र श्वास घेण्यास पवार बारामतीकरांना मदत करणार काय? उद्या बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीनंतर शरद चंद्रजी पवार साहेब सभागृहात किती पात्र अपात्र सज्जन दुर्जन नगरसेवक पदाची शपथ घेणार आहेत हे आपल्या इशाऱ्यावर आदेशावर सूचनेवर अवलंबून राहील बारामतीचं शांतता व सुव्यवस्था विकास आपल्या स्वाधीन करतो व आपल्या निर्णयाची वाट पाहतो.

आपला कृपा अभिलाषी
बारामतीकर मतदार
क्रमशः


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »