…अन् थोडक्यात जीव वाचला! चायनीज मांज्याने युवक गंभीर जखमी
बारामती: बारामती मध्ये नागपंचमी लोकांच्या जीवावर बेतली असल्याचे भयानक दृश्य समोर आले पतंग उडवण्यासाठी लागणारा चायनीज नायलॉन मांजा हा घातक ठरत आहे. बारामती मधील पाटस रोड येथे दुचाकीस्वार आदित्य उंडे हा युवक चालला असता चायनीज मांज्यामुळे त्याच्या जीवावर बेतले आहे. त्याला तोंडावर व मानेवर गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. सदर युवकाला उपचारासाठी बारामती येथील बारामती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. सदर तरुणाची सर्जरीच करावी लागेल असे तज्ञ डॉक्टरांकडून समजले जात आहे हा चायनीज मांजा बारामतीमध्ये मांजा विक्रेत्या कडून विक्री केला सुद्धा आहे अनेक सामाजिक संघटनांनी पोलीस प्रशासनास व बारामती नगरपालिका यांना चायनीज मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी असे निवेदन दिले तरीसुद्धा पोलीस प्रशासन कडून विक्रेता वर जाणून-बुजून दुर्लक्ष केले असल्याचे समजले जाते. पोलिसांनी मांजा विक्री करणाऱ्यांना अगोदरच ताब्यात घेऊन कारवाई करायची होती परंतु पोलीस प्रशासनाने तसे केले नाही त्यामुळे एका युवकाला गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले आहे. उलट पतंग उडवण्यासाठी काही पोलीस अधिकाऱ्यांनीच मांजा विक्रेत्यांकडून मांजा घेऊन गेले आहेत अशी चर्चा परिसरामध्ये सुरू आहे सदर घडलेल्या घटनेला जबाबदार कोण असे लोकांकडून विचारले जात आहे. अखेर किती? जीव गेल्यावर या जीवघेण्या चायनीज मांजा विक्रेत्यांवर कारवाई होणार की नाही असे प्रश्न उपस्थित होत आहे.