निरगुडे येथील भगवानराव खारतोडे यांच्या 35 दिवसाच्या उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष


इंदापूर : इंदापूर तालुक्यातील निरगुडे गावामधील शेतकरी भगवानराव खारतोडे व त्यांच्या पत्नी यांनी उपोषण सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळ निधी जमा होवा या साठी हे उपोषण असल्याचे सांगण्यात येत आहे. तहसीलदार साहेब यांनी तात्काळ अहवाल देऊन शासनाला द्यावा ह्यासाठी भगवानराव खारतोडे मृत्यूची झुंज देत आहे 35 दिवस झाले तरीसुद्धा त्यांचे उपोषण स्थगित झाले नाही.

Advertisemen

इंदापूर तालुक्याचे माजी मंत्री व आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी सुद्धा उपोषण ला भेट दिली व जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण भैय्या माने यांनी सुद्धा उपोषणाला भेट दिली परंतु अद्याप यांना न्याय मिळाला नाही. संपूर्ण जिल्हा हा दुष्काळग्रस्त घोषित केला आहे, त्यामुळे दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावा या मागणीसाठी निरगुडे गावचे भगवानराव खारतोडे व त्यांच्या पत्नी गेली 35 दिवस उपोषणाला बसले आहेत. त्यावर शासन व प्रशासन जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याचे समजत आहे. कृषी अधिकारी तलाठी मंडलाधिकारी यांनी पंचनामे केली नाहीत. त्यामुळे शेतकरी हा दुष्काळ निधीपासून वंचित राहिला आहे. यावर तालुक्यातील अनेक गावांमध्ये भगवानराव खारतोडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन चालू आहे. जोपर्यंत दुष्काळ निधी हा शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणारच असे भगवानराव खारतोडे यांनी सांगितले. माननीय तहसीलदार साहेबांनी भेट दिली तरी सुद्धा जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत नाही. तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नाही असे उपोषणकर्त्यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »