नवयुवा मतदारांनी २० ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी करावी-तहसीलदार गणेश शिंदे


बारामती, दि.५: भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे; आता आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाकरीता नागरिकांनी २० ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी करावी, असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले.

विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय येथे आयोजित नव मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियानाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्राचार्य भरत शिंदे, स्वीप समन्वयक सविता खारतोडे, प्रा. डॉ.मंगल ससाने, प्रा. अमित भिवारे, प्रा. गौतम कुदळे, तलाठी प्रदीप चोरमले यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisemen

श्री. शिंदे म्हणाले, या मोहिमेअंतर्गत मयत अथवा स्थलांतरीत मतदाराचे नाव वगळणे, नावामध्ये किंवा पत्त्यात दुरुस्ती करणे आदी कार्यवाही करण्यात येत आहेत. नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने किंवा नजीकच्या मतदान केंद्रावर नाव नोंदणी करता येणार आहे. नवमतदार नावनोंदणीसाठी मतदारांनी अर्ज क्र. ६, मयत अथवा स्थलांतरीत मतदाराचे नाव वगळण्याकरीता अर्ज क्र.७, आणि नावामध्ये किंवा पत्यामध्ये दुरुस्ती करण्याकरीता अर्ज क्र. ८ सादर करावे. विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदवून इतरांना नाव नोंदणी करण्यास प्रोत्साहित करावे.

श्री. शिंदे यांनी ‘लोकशाहीतील युवकांची भूमिका’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

श्रीमती. खारतोडे यांनी वोटर हेल्पलाईन या ॲपद्वारे मतदार नोंदणी करण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले.

यावेळी २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे मतदार नोंदणी करण्यात आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »