मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट
बारामती – बारामतीमध्ये डी.जे. अम्युजमेंटने ‘लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट’ प्रदर्शन भरवले आहे, जे मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना अनोखा अनुभव देणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात, १८० फूट लांब, ४५ फूट उंच आणि १५ फूट रुंद असा हुबेहूब लंडन ब्रिज साकारण्यात आला आहे, ज्यावरून लोकांना चालण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच, चित्रांच्या माध्यमातून विद्युत रोषणाईने सजवलेली युरोपियन स्ट्रीटची प्रतिकृतीही पाहता येणार आहे.
ज्येष्ठ नगरसेवक श्री किरण दादा गुजर यांच्या हस्ते २७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता याचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी विविध मनोरंजक राइड्स उपलब्ध आहेत, ज्यात जायंट व्हील, कोलंबस, ड्रॅगनट्रेन, ब्रेक डान्स, मोठा पाळणा, पेडलबोट, जंपिंग आणि मिनी ट्रेन यांचा समावेश आहे.
येथे एकाच छताखाली घरगुती वस्तू, क्रीडा उपकरणे, भांडी, खेळणी आणि कपड्यांची खरेदी करता येणार आहे. तसेच, पुस्तकांचा स्टॉल असून त्यावर सवलतीत पुस्तके उपलब्ध आहेत. खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे, ज्यात पाणीपुरी, चाट, पॉप-कॉर्न, आईस्क्रीम आणि इतर अनेक पर्याय आहेत. सेल्फीसाठीही खास जागा तयार करण्यात आली आहे. संयोजकांनी बारामतीकरांना या अनोख्या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.