Ramdas Athavale : बारामतीमध्ये पार पडली रामदासजी आठवले यांची सभा!


बारामती : बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारार्थ दि.25 एप्रिल 2024 रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांची सभा बारामती येथील रयत भवन या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी महायुतीतील विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना रामदासजी आठवले साहेब म्हणाले की माझ्या पक्षाचा विस्तार संपूर्ण भारतभर असून प्रत्येक वाड्यावस्तावर माझा कार्यकर्ता आहे. नागालँड मध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत. बारामती देखील महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांना विजयी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते मनापासून काम करतील.

Advertisemen


यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे ,महारष्ट्र सचिव परशुराम वाडेकर,पुणे जिल्हा अध्यक्ष विक्रम शेलार,प्रसिध्दी प्रमुख हेमंत रणपिसे,राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर ,तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,शहराध्यक्ष जय पाटील, भारतीय जनता पक्षाचे सचिन साबळे,अक्षय गायकवाड,शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे तसेच महायुतीतील घटक पक्षांचे बारामती शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
सदरील सभा यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा रत्नप्रभा ताई साबळे,पुणे जिल्हाध्यक्ष युवक कार्याध्यक्ष रविंद्र(पप्पू)सोनवणे, प .महाराष्ट्र सचिव सुनील शिंदे,बारामती तालुका महिला कार्याध्यक्ष पूनम ताई घाडगे आदींनी मोलाची भूमिका पार पाडली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »