‘स्वप्निल फडतरे’ यांना ‘पुणे उद्योग भूषण २०२४ अंतर्गत ‘Excellence in Stock Market Analysis’ हा मानाचा पुरस्कार प्रदान


पुणे – येथील स्विफ्टनलिफ्ट संस्थे तर्फे केलेल्या सर्वेक्षण नुसार विविध व्यवसायाला चालना देणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्यात आला. त्यानुसार ‘स्टॉकवाईज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे संस्थापक आणि संचालक ‘स्वप्नील मुरलीधर फडतरे’ यांना नामांकित ‘पुणे उद्योग भूषण पुरस्कार २०२४’ हा मानाचा पुरस्कार पुणे (दि १३ जान ) येथील समारंभात प्रदान करण्यात आला. मराठी सिने अभिनेत्री सायली संजीव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले

स्टॉकवाईज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सेबी (Secuirity Exchange board of India) प्रमाणित आणि NISM(National Institute of Securities Markets) सर्टिफाइड असून कंपनीचे संस्थापक ‘ स्वप्नील फडतरे’ यांना स्टॉक मार्केट क्षेत्रामध्ये १२ वर्षांचा अनुभव असल्याने कंपनी पोर्टफोलिओ म्यानेगमेंट , स्टॉकमार्केट एजुकेशन, म्युचल फंड , इन्शुरन्स, फायनान्शिअल प्लांनिंग इत्यादी डिपार्टमेंट्स मध्ये कार्यरत आहे.

Advertisemen

अपुऱ्या माहितीशिवाय शेअर बाजार मध्ये उतरणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. शेअर मार्केटला काही लोक जुगार असे देखील म्हणतात पण खरे तर तो एक बुद्धीचा खेळ आहे. या खेळात कोणीही उतरू शकतो व पैसे कमवू शकतो. शेअर मार्केटच्या मदतीने सामान्य मनुष्य सुद्धा मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये हिस्सेदारी मिळवू शकतो. BSE आणि NSE हे भारतातील आघाडीचे स्टॉक एक्सचेंज आहेत. परंतु शेअर मार्केट एक अशी जागा जिथे बरेच लोग पैसे कमवतात तर बरेच लोक आपले पैसे गमावून पण टाकतात. शेअर मार्केटमध्ये जोखीम खूप असते, म्हणून जे लोक जोखीम घ्यायला तयार असतील त्यांनीच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला हवी. आज शेअर बाजारात गुंतवणुकीचे अनेक मोबाइल अँप आणि संकेतस्थळ उपलब्ध आहेत. परंतु शेअर बाजारात गुंतवणुक करताना योग्य ते मार्गदर्शन असले पाहिजे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »