अजितदादा पवार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याची बारामती नगर परिषदेतील नगरसेवकांची मागणी


बारामती, दि. — राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बारामतीचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा अनंतराव पवार यांना सन २०२५-२०२६ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात यावा, यासाठी बारामती नगर परिषदेने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

यासंदर्भात नगराध्यक्ष सचिन सातव यांना निवेदन देण्यात आले असून त्यावर नगरसेवक गणेश जोजारे, राहुल वाघोलीकर, सोमनाथ गजाकस आणि अमोल कावळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अजितदादा पवार यांनी गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ बारामती आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम करताना राज्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच कृषी, सहकार, जलसंपदा आणि जनसेवा या क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Advertisemen

बारामती पॅटर्नच्या माध्यमातून शेतकरी, दूध संघ, सहकारी साखर कारखाने आणि विविध सहकारी संस्थांना बळकटी देण्याचे काम त्यांनी केले. जलसंपदा मंत्री म्हणून अनेक सिंचन प्रकल्पांना गती देऊन लाखो एकर जमीन ओलिताखाली आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

लोकप्रशासन, समाजसेवा आणि राज्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाच्या आधारे अजितदादा पवार हे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी पात्र असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले असून, नगर परिषदेकडून शासनाकडे अधिकृत प्रस्ताव पाठविण्याची मागणी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »