बारामती बस स्थानक असुरक्षित!
बारामती– बारामती वरून इंदापूरला जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या एसटीमध्ये कोयता घेऊन एक माथे फिरू मागच्या बाकावर बसला. वेडास्तो त्याने आपल्या पिशवीतला धारदार कोयता काढून एका अनोळखी गायकवाड नावाच्या तरुणावर सपासप वार केले. हे हृदय विदारक चित्र पाहून एका महिलेचे शुद्ध हरपली व ती बेशुद्ध झाली. अटक करून त्याची रवानगी वेड्याच्या इस्पितळात मध्ये करण्यात आली पण या दुर्घटनेची दुसरी बाजू या हल्ल्याच्या भीतीने घाबरलेली माऊलीं कित्येक दिवस मृत्यू शी झुंज देत प्राणज्योत मावळली.
बारामती बस स्थानकावर शेकडो नागरिक असताना हा मातेफिरु वेडा प्रवासी बस मध्ये बसतो कसा? सीसीटीव्ही मध्ये त्याचे विकृत हालचाली बस स्थानकाच्या सुरक्षारक्षकांना दिसल्या नाहीत का? याचे वेडेपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रीत झाले नाही का? बस स्थानकावर ती होणाऱ्या वारंवार लहान मोठ्या चोऱ्या, प्रवाशांची पळवा पळवी, एजंटची मारामारी या सगळ्या गोष्टी एसटी स्टँड सुरक्षा रक्षकांच्या देखरेखित चाललेल्या असतात. यावर बस स्थानक प्रशासन मूग गिळून शांतता का? आता एका माथे फिरू च्या वेडेपणाच्या हल्ल्याचा धासका घेऊन बेशुद्ध होऊन मृत पावलेल्या महिलेच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? या मृत्यूस कोण जबाबदार आहे? बारामती बस स्थानक प्रशासन, बस स्थानकाच्या सुरक्षा यंत्रणा की अजून कोण? त्या येड्यावर मृत्यूस जबाबदार असल्याचं कलम वाढवून वृत्तपत्रान मध्ये प्रसिद्धी पत्रक देऊन या प्रकरणावर पाणी सोडणार आहात का? की एका मातेच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या एका प्रशासन व अधिकारी यांच्यावर हत्येची जबाबदारी निश्चित करून त्यांना गजा आड टाकणार?
या झालेल्या चुका व होणाऱ्या चुका पुन्हा पुन्हा होऊ नये व बारामतीचे बस स्थानक आंतरराष्ट्रीय विमानतळा सारखे सुरक्षित व्हावे ही जनसामान्याची तीव्र प्रबळ इच्छा आहे. (युगानल भोसले)


