अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरु; बचाव पथकाच्यावतीने ८ नागरिकांची सुखरूप सुटका


बारामती : तालुक्यातील होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर काटेवाडी परिसरात ७ आणि बारामती शहरातील १ असे एकूण ८ नागरिकांची बचाव पथकाच्यावतीने सुखरूप सुटका केली आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे.

नीरा डावा कालवा फुटल्यामुळे बाधित झालेल्या काटेवाडी या गावातील, अतिवृष्टीमुळे बाधित नारोळी, कोरोळी येथील काही कुटुंबे तसेच बारामती शहरातील तीन धोकादायक इमारतीमधील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

Advertisemen

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी
नदीपात्र, कॅनॉल परिसरात जाऊ नये, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, आपत्कालीन परिस्थितीच्या काळात प्रशासनाशी संपर्क साधून प्रशासनास सहकार्य करावे, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »