गूड न्यूज! महाराष्ट्र राज्य पोलीस दलात बंपर भरती, 17471 रिक्त जागांवर भरती


 

Police Bharti : महाराष्ट्र राज्य पोलीस दलात बंपर भरती सुरु असून 17471 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सध्या बंपर भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत 17471 विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात हवालदार आणि ड्रायव्हर पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज दाखल करावा लागेल. महत्त्वाचं म्हणजे या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. आता पोलीस भरतीसाठी तुम्हाला 15 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे.

Advertisemen
  • अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 5 मार्च 2024

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 एप्रिल 2024

  • रिक्त पदांची संख्या : 17471

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई आणि बॅन्डसमन पदांवर भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात भरतीसाठी अर्ज दाखल करण्याऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 या दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल. यासाठी इच्छुक उमेदवाराने अधिकृत अधिसूचना वाचावी.

महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला 450 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर मागासवर्गातील उमेदवाराला अर्ज शुल्कात 100 रुपये सूट मिळेल, त्यामुळे 350 रुपये अर्जाची शुल्क भरावे लागेल. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवाराने बारावी उत्तीर्ण असणे किंवा त्या समकक्ष पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »