पुणे जिल्ह्यातील न्हावी गावात पोलिसांनी मारला छापा, 27 लाखांचे अफू जप्त; तिघांना अटक
पुणे: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत 27 लाख 56 हजार 460 रुपये किमतीचे 883 किलो ग्रॅम अफू जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली असून स्थानिक गुन्हे शाखा आणि वालचंदनगर पोलीस स्टेशनने संयुक्तपणे ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्हावी गावात काही लोक शेतीच्या नावाखाली अफूची लागवड करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी 21 फेब्रुवारी 2024 रोजी छापा टाकला.
छाप्यात रतन कुंडलिक मारकड, बाळू बाबूराव जाधव आणि कल्याण बाबूराव जाधव यांना अटक करण्यात आली. त्यांच्या शेतात अफूची लागवड आढळून आली. विशेष म्हणजे, अफूची लागवड लपवण्यासाठी या तिघांनी शेतात कांदा, लसूण आणि मका या पिकांची लागवड केली होती. पोलिसांनी 883 किलो ग्रॅम अफू जप्त केले असून, त्याची किंमत 27 लाख 56 हजार 460 रुपये आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार:
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सपोनि राजकुमार डुणगे, सपोनि कुलदीप संकपाळ, सपोनि राहुल गावडे, पोलीस अंमलदार स्वप्नील अहीवळे, बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, अजय घुले, ईश्वर जाधव, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, योगेश नागरगोजे, धिरज जाधव, दगडू विरकर, आसिफ शेख, रामदास बाबर, बाळासाहेब खडके, अमोल शेडगे, महेश बनकर, अतुल डेरे, मंगेश थिगळे, विभीषण सस्तुरे, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोसई विजय तेळकीकर, पोलीस अंमलदार रविंद्र पाटमास, बापू मोहिते, गुलाब पाटील, शरद पोफळे, विक्रमसिंह जाधव, अभिजीत कळसकर, गणेश बनकर, बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अंमलदार स्मिता गायकवाड, मेघा शिंदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुणे ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी बेकायदेशीर अफू लागवडीची माहिती पोलिसांना द्यावी.