स्वामित्व योजने अंतर्गत नव्याने नगर भूमापनाचे काम करुन नविन गावठाणांच्या तयार केलेल्या सनद व मिळकत पत्रिका वितरणाचा कार्यक्रम संपन्न
बारामती : केंद्र सरकारच्या स्वामित्व योजने अंतर्गत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे हस्ते देशभरात जवळपास 50,000 गांवामध्ये 58 लाख मिळकत पत्रिका वाटप करणे व या योजने अंतर्गत लाभार्थ्यांशी संवाद साधनेकामी आज दि.18 जानेवारी 2025 रोजी कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय स्तरावर करणेत आलेले होते. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामविकास विभाग, भूमि अभिलेख विभाग व सर्व्हे ऑफ इंडिया यांनी मिळून केलेल्या महत्वकांशी स्वामित्व योजने अंतर्गत नव्याने नगर भूमापनाचे काम करुन नविन गावठाणांच्या तयार केलेल्या सनद व मिळकत पत्रिका वितरणाचा कार्यक्रम बारामती तालुकास्तरावर व ग्रामिण स्तरावर घेणेत आला. बारामती तालुक्यातील स्वामित्व योजने अंतर्गत करणेत आलेल्या 48 गावांपैकी 45 गावांमध्ये ड्रोनद्वारे मोजणीकाम करणेत येवून नगर भूमापन चौकशी करुन एकूण 7672 एवढ्या नविन मिळकत पत्रिका व सनदा तयार करण्यात आलेल्या आहेत. तयार करणेत आलेल्या सनदा लाभार्थ्यांना वाटपांचे काम उप अधीक्षक भूमि अभिलेख, बारामती कार्यालयाकडून प्रगतीपथावर आहे. आज दि.18 जानेवारी 2025 रोजी स्वामित्व योजने अंतर्गत नविन तयार करणेत आलेल्या मिळकत पत्रिका वाटप करणे व या योजने अंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधनेकामी तालुकास्तरावर सोनवडी सुपे येथील लाभार्थ्यांना पंचायत समिती बारामती येथे मिळकत पत्रिका व सनद वितरणाचा कार्यक्रम घेणेत आला. श्री. डॉ. अनिल बागल गट विकास अधिकारी, बारामती व श्री. संजय धोंगडे, उप अधीक्षक भूमि अभिलेख, बारामती व दोंन्ही कार्यालयातील कर्मचारी यांचेकडून संयुक्तपणे हा कार्यक्रम राबविणेत आला.
तसेच या दोंन्ही कार्यालयाच्या वतीने ग्रामिण स्तरावर मौजे कोळोली या गावी गावचे माजी संरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व मान्यवरांचे व लाभार्थ्यांचे स्वागत करणेत आले. त्यांनंतर स्वामित्व योजने अंतर्गत नविन गावठांणाची ड्रोनद्वारे मोजणीकाम करणेत येवून नगर भूमापन चौकशी केलेल्या कामाची त्यामुळे सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या फायद्याची व शासन स्तरावरील या योजनेच्या कामाची चित्रफित दाखविणेत आली. या योजनेची माहिती व होणारे फायदे याबाबत दोन्ही विभागांतील अधिकारी यांनी जनतेचे मार्गदर्शन केले. या योजनेमुळे सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात होणाऱ्या बदलांबाबत मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. स्वामित्व योजने अंतर्गत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशातील जनतेला याबाबत केलेल्या संबोधन व प्रातिनिधिक स्वरुपात सनद वितरण केलेल्या कार्मक्रमाचे लाईव्ह प्रेक्षेपण दाखविणेत आले. तसेच उपस्थित नागरीकांना नशामुक्ती व स्वच्छतेबाबतची शपथ देणेत आली. या कार्यक्रमास बँक आफ बडोदा शाखेचे प्रतिनिधीही उपस्थित होते.