सामाजिक कार्यकर्ते अस्लम रज्जाक तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग बारामती शहराध्यक्ष पदी निवड
बारामती : बारामती येथील सामाजिक कार्यकर्ते अस्लम रज्जाक तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग बारामती शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले असून यावेळी बारामती शहराध्यक्ष ऍड. संदीप गुजर तसेच युवक बारामती शहराध्यक्ष सत्यव्रत काळे हे ही उपस्थित होते खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा युवक मेळावा झाला होता त्यामध्ये अस्लम तांबोळी यांचा मोलाचा वाटा होता मुस्लिम समाजातील युवकांना कायम ते सोबत घेऊन न्याय हक्कासाठी लढतात. अस्लम तांबोळी यांना सामाजिक कामाची आवड आहे. ते यापूर्वी संभाजी ब्रिगेड या संघटनेचे बारामती शहर अध्यक्ष होते. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांची निवड करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मी पदाला योग्य ते न्याय देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष बांधण्यासाठी प्रयत्न करीन व पक्ष बळकट करीन अशी ग्वाही अस्लम तांबोळी यांनी दिली.