मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण २ फेब्रुवारीपर्यंत
नागरिकांनी सर्वेक्षण कामास सहकार्य करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन
बारामती, दि. १: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाच्या कामास २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली नागरिकांनी सर्वेक्षण कामाकरीता सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा समाज व खुल्या गटातील नागरिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षणाचा कालावधी २३ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ पर्यत होता. अद्याप काही प्रमाणात सर्वेक्षणाचे काम बाकी आहे त्यामुळे आयोगाने ही मुदत वाढवून दिली आहे.
या सर्वेक्षणासाठी बारामती नगरपरिषदेने १५४ प्रगणक व १० पर्यवेक्षकांची नेमणूक केली आहे. तरी शहरातील ज्या कुटुंबाचे सर्वेक्षण करावयाचे राहिले आहे; अशा कुटुंबांनी पर्यवेक्षक संजय चव्हाण, महेश आगवणे, अश्विनी अडसूळ, योगिता दरेकर, सुप्रिया बोराटे, स्नेहल घाडगे. रियाज काझी, संजय प्रभुणे, रंजना दुर्गाडे, रविना भोसले यांच्याशी २ फेब्रुवारी २०२४ पर्यंत नगर परिषदेच्या ०२११२-२२२३०७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक महेश रोकडे यांनी केले आहे.