कटफळ परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा धडक कारवाईचा बडगा; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल


कटफळ परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा धडक कारवाईचा बडगा; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

बारामती, दि. 30 : बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कटफळ परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीच्या धंद्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत देशी दारूच्या बाटल्यांसह रोख रक्कम जप्त करण्यात आली.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, 29 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास बारामती तालुका पोलिसांनी कटफळ परिसरात विविध ठिकाणी छापे टाकले.

पहिल्या कारवाईत कटफळ रेल्वे लाईनजवळ अवैध दारूविक्री करत असलेल्या हर्षद गणेश निकाळजे (रा. कनेरी, ता. बारामती) याच्याकडून 2 हजार 800 रुपये किमतीच्या देशी दारूच्या 70 बाटल्या तसेच 1 हजार 520 रुपये रोख रक्कम असा एकूण 4 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 311/2026 नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(E) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisemen

दुसऱ्या कारवाईत सौ. दिव्या गणेश मदने (रा. कटफळ, ता. बारामती) या एमआयडीसी आयर्न बॉयलर कंपनीजवळ अवैध दारूविक्री करताना आढळून आल्या. त्यांच्या ताब्यातून 2 हजार 400 रुपये किमतीच्या देशी दारूच्या 60 बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 312/2026 नुसार कारवाई करण्यात आली.

तिसऱ्या कारवाईत मुकुंद चंदर मदने (रा. कटफळ, ता. बारामती) याच्याकडे कटफळ गाव हद्दीतील समर्थ हॉटेलजवळ छापा टाकण्यात आला. त्याच्याकडून 960 रुपये किमतीच्या देशी दारूच्या 24 बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 313/2026 नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(E) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक , अपर पोलीस अधीक्षक , उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ग्रेड पोलीस उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

पोलिसांनी अवैध दारूविक्रीविरोधातील मोहिम अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला असून, नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »