कृषीक प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी कोकण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
बारामती – कृषीक प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी कोकण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी प्रदर्शनास सहभाग नोंदवला. शेतकऱ्यांना या प्रदर्शनात नाविन्यपूर्ण विषय असलेला शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर बाबत शेतकरी उस्फुर्तपणे माहिती घेतली. जमिनीमध्ये सेंसर तंत्रज्ञान कसे काम करते, त्याचा वापर कसा पिकांसाठी आवश्यक असलेले विविध घटक योग्य वेळेत योग्य प्रमाणात अचूक रित्या कसे मिळतात, त्यासाठी येणारा खर्च, त्याचबरोबर आमची शेती एक ते दोन एकरच आहे त्याला हे तंत्रज्ञान आम्हाला सहजरीत्या वापरता येईल का व ते आम्हाला परवडेल का यासारखे प्रश्न विचारत त्यांनी तज्ञांकडून माहिती घेतली. आपल्यासारख्या छोट्या शेतकऱ्यांनाही हे तंत्रज्ञान वापरता येऊ शकते आणि सध्या मोबाईलच्या जगामध्ये आपणही सहज ते वापरू शकतो असा विश्वास शेतकऱ्यांनाही आला आणि त्यानी याबाबत समाधान व्यक्त केले.
आजच्या प्रदर्शनामध्ये आमदार रोहित पवार यांनीही भेट दिली.
त्यांनी प्रक्षेत्रावर असलेले विविध तंत्रज्ञान जाणून घेतले तसेच सध्या दुष्काळी परिस्थिती आहे आणि शेतकऱ्याला कमी खर्चाचे तंत्रज्ञान या ठिकाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी ते पाहून घ्यावे व आपल्या शेतात अवलंब करावा. या ठिकाणचे फार्म ऑफ फ्युचर- भविष्यातील शेती कशी असेल याबाबत शेतकऱ्यांनी नक्की हे प्रदर्शन पाहावे असे आवाहन त्यांनी केले.
जनावरे प्रदर्शन मध्ये आकर्षण मुका देणारा खीलार बैल
या बरोबरच तुर्कस्थान येथील ३ फुटी कणीस असलेली बाजरी, लाल केळी, ब्लू जावा केळी, ड्रोन ए. आय. मॉनीटर, फुलशेती उस्फुर्तपणे पहिली. जनावरांच्या प्रदर्शनामध्ये मुका देणारी काजळी खिलार बैल खुपच आकर्षण ठरले आहे. पुंगनूर गाय, कपिला खिलार, लाल खांदारी वळू, सहिवाल, देवणी गाय व काश्मिरी, आफ्रिकन शेळ्या पाहण्यासाठी उत्कृष्ठ आहेत.
सोमवार दिनांक 22 जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन शेतकऱ्यांना खुले आहे. दि 20 व 21 जानेवारी रोजी हॉर्स शो आयोजित केला असून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रातर्फे करण्यात आले.