नगरसेविकेच्या नातेवाईकांचा प्रशासनावर हल्लाबोल !


बारामती – बारामती नगरपरिषद कचरा विघटन केंद्रावर आरोग्य विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत नगरसेविकेच्या नातेवाईकांनी बेकायदेशीर घुसखोरी करून महत्त्वाच्या खुर्च्यांवर ताबा घेतला. या कृतीने आपल्या नगरसेविकेच्या पदाला बाधा येऊ शकते याची पूर्ण जाणीव असताना या बैठकीत प्रत्यक्ष सहभाग घेऊन नगरपालिकेच्या परंपरेला कालिंबा फसला आहे. अनेक नगरसेविकेचे नातेवाईक नगरपरिषद कार्यालयामध्ये घुसून, बेकायदेशीर अधिकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी करताना वाद घालताना व दबाव टाकताना दिसून येत असून स्वतः मुख्याधिकारी अशा बेकायदेशीर नियमबाह्य व्यक्तींना कार्यालयात सन्मानाचे स्थान देऊन मुजरा करत असतात.

Advertisemen

​याचा दुष्परिणाम म्हणजे मुख्याधिकार्‍यांच्या हाताखालचे कर्मचारी अधिकारी अशा व्यक्तींचे आदरातिथ्य व सन्मान करत आहेत. नाहक बोलणी खाऊन दादागिरी सहन करीत आहेत. शासनाच्या नियमानुसार नगरसेविकेच्या नातेवाईकांनी असे काम केल्यास संबंधित नगरसेविकेचे पद बाद करण्यासंबंधीचा अहवाल शासनास कळवून पद रद्द करण्याची तरतूद आहे, तरी प्रशासन अशा लोकांना पाठीशी का घालत आहे?


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »