बारामती शहरामध्ये दलितवस्तीतील विद्युत दिव्यांची दुरावस्था
बारामती : बारामती शहरातील मागासवर्गीय वस्तीतील विद्युत दिव्यांची दुरावस्था झाली आहे.याबाबत बारामती नगर परिषदचे मुख्याधिकारी महेश रोकडे,विद्युत विभागाचे अधिकारी मोरे, कर्मचारी सुतार तसेच शहरातील विद्युत पोलवरील दिव्यांची दुरुस्ती करण्यासाठी नगरपरिषदेकडून ज्यांना ठेका देण्यात आला आहे त्या समुद्र टेक्नोलॉजी कंपनीचे अधिकारी ढगे आणि जगताप यांना देखील संबंधित दिवे दुरुस्त करण्यात यावे याबाबत वारंवार सांगितले असताना देखील अद्याप या दिव्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही.
आधीच याभागात विद्युत पोल बसविण्याकरिता मोठा संघर्ष आम्ही केलेला असून आता सदरील दिवे दुरुस्तीसाठी देखील संघर्षच करावा लागणार असेल तर लवकरच बारामती नगरपरिषद आणि नगर परिषदेतील मुजोर अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारा विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे मा.रविंद्र(पप्पू)सोनवणे (युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा RPI (आठवले)यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.