डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या तोंडावर इंदापूरमध्ये अनुचित प्रकाराने खळबळ!


इंदापूरः पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामधील भवानीनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा डिझेल टाकून जाळल्याचा खळबळजनक अनुचित प्रकार आज, गुरुवारी (दि. ११) सकाळच्या सुमारास घडला आहे. सदरची कृत्य हे अशोक हनुमंत निचळ याने केले असल्याचे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सांगितले आहे. सदर व्यक्ती गाडीवर तलवार व बाटलीमध्ये डिझेल घेऊन येवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा जाळली. ही घटना पाहून काही आंबेडकरी अनुयायांनी प्रतिमा विजवण्यासाठी गेले असता अशोक हनुमंत निचळ याने तलवार काढून त्यांच्या अंगावर धावून गेला व त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना अतिशय घाणड्या भाषेत जाती वाचक शिव्या दिल्या.

संबंधित व्यक्तीच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व शस्त्र अधिनियम यानुसार गुन्हा नोंदवला गेला आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार,मोहन ज्ञानदेव सुरुडकर, वय 54 वर्षे, जात बौध्द (हिंदू महार), व्यवसाय मजुरी, शेती, रा. अशोकनगर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ, भवानीनगर, सणसर, ता. इंदापुर, जि.पुणे समक्ष वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे हजर राहुन फिर्यादी जबाब देतो की, वरील ठिकाणी मी माझी पत्नी शैला सुरूडकर, मुलगा रोहन, मुलगी ज्योत्सना, भाऊ नामे कैलास सुरूड्ड़‌कर, भावजय सविता सुरूडकर, दोन पुतणे नामे ऋतुराज, शिवराज यांच्यासह एकत्रित कुटूंब पध्दतीने राहण्यास आहे. तसेच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी 2024 या उत्सवाचा मी उत्सव कमिटी प्रमुख आहे. आज रोजी महात्मा जोतिबा फुले यांची जयंती असल्याने सदर जयंती भवानीनगर कारखान्याचे समोर असलेले महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा याठिकाणी मी सकाळी 08/00 वाजता माझे उत्सव कमिटी मधील सदस्य दिनेश अशोक शिंदे, संतोष गौतम लोंढे, नंदराज थोरात व इतर गावातील 70 ते 80 लोक हे जयंतीसाठी हजर होते. त्यानंतर आम्ही सकाळी 08/30 ते 09/00 वा दरम्यान महात्मा जोतिबा फुले यांची परापंरागत जयंती साजरी केली. त्यावेळी सदर जयंती साजरी करत असताना आमच्या गावामधील इसम नामे अशोक हनुमंत निचळ हा देखील त्याठिकाणी हजर असल्याचे मी पाहिले होते. जयंती साजरी केल्यानंतर सकाळी 09/10 वा सुमारास आम्ही सर्वजण भवानीनगर परिसरामध्ये आपआपल्या कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. त्यावेळी स्वस्तिक कलेक्शन, भवानीनगर समोर मी व माझे मित्र दिनेश शिंदे, संजय दुपारगुढे, संतोष गौतम लोंढे, अशोक ज्ञानदेव गायकवाड, दत्तात्रय तुळशीदास गुप्ते असे चर्चा करत असताना मला भवानीनगर बसस्थानकच्या बाजुच्या मोकळ्या जागेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्त लावलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेकडर जयंती उत्सवाचा बॅनर जवळ आमच्या वस्तीवरील इसम अशोक हनुमंत निचळ हा त्याच्याकडील दोन चाकी गाडीवरुन आला. त्यावेळी त्याने बॅनर समोर त्याची दोन चाकी गाडी थांबवुन गाडीवरुन खाली उतरला. त्याचवेळी त्याने गाडीच्या हॅन्डलला लावलेल्या पिशवीमधुन एक प्लॅस्टिक बॉटल काढुन व त्याबाटली मध्ये असलेले ज्वलनशील पदार्थ सारखे काहीतरी त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनरवर टाकले व खिशामधुन काडीपेटी काढुन काडी पेटवुन तो बॅनर पेटवून दिला. त्यावेळी बॅनर पेटल्याचे पाहून आम्ही सर्वजण त्या बॅनरच्या दिशेन धावत, पळत, ओरडत गेलो. त्यावेळी आमच्या ओरडण्याच्या आवाजाने व पेटलेला बॅनर पाहुन इतर लोकदेखील त्याठिकाणी पळत आले. त्यावेळी मी व दिनेश शिंदे, संजय दुपारगुढे असे बॅनर विझवण्यासाठी पुढे गेलो असता त्याने हातामध्ये असलेली प्लॅस्टिकची बाटली ही जमिनीवर टाकली व गाडीच्या पिशवी मध्ये ठेवलेली तलवार काढून धावत आमच्या अंगावर आला.

Advertisemen

त्यावेळी त्याने मला जिये मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या कडील लोंखडी तलवारीने जोरात माझ्या डोक्यावर वार केला असता तो मी चुकविला व साईडला गेलो. त्यावेळी परत तो माझ्यावर वार करण्यासाठी आला असता संजय दुपारगुढे याने अशोक निचळ याला पाठिमागुन पकडले असता मोहन मधुकर कांबळे व हिंमत दत्तात्त्य गुप्ते यांनी त्याच्याकडील तलवार हिसकावुन घेतली. आम्ही त्याठिकाणी त्याच्याकडुन तलवार हिसकावुन घेत असताना तो बॅनरकडे पाहुन “असल्या महारा मोगाचे बॅनर भवानीनगर चौकात लावायचे नाही, कोण मला आडवतो त्याला बघतो, जर कोणी मध्ये आला तर त्याला मारुन टाकेन” असे म्हणुन आमच्या जातीवरुन वाईट वाईट, घाणेरड्या भाषेत, शिवीगाळ करुन अपमानास्पद भाषा करु लागला. त्यावेळी संतोष गौतम लोंढे, अशोक गायकवाड, हनुमंत अडसुळ यांनी पळत जावुन जयभवानी स्विट होम येथून पाण्याची बादली आणून पेटलेला बॅनर विझवला. त्यानंतर अशोक निचळ याने जमिनीवर फेकलेली बाटली पाहली असता त्यामध्ये मला डिझेल असल्याचे दिसले. त्यावेळी तेथे जमलेल्या काही नागरिकांनी सदर घटनेचे मोबाईल मध्ये व्हिडीओ शुटींग व फोटो काढले होते तसेच तिथे जमलेल्या नागरिकांमधील चार ते पाच नागरिक हे पुढे आले व त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बॅनर काढून घेतला. त्यानंतर आम्ही सर्व लोकांनी त्यास पकडुन भवानीनगर पोलीस चौकी याठिकाणी नेले व झालेला सर्वे प्रकार तिथे असलेल्या पोलीसांना सांगुन त्याच्याकडील लोखंडी तलवार, डिझेलची बाटली व काडेपेटी (माचिस) व त्याची दोन चाकी ही ताब्यात दिली. तरी आज दिनांक 11/04/2024 रोजी सकाळी 09/10 वा सुमारास भवानीनगर बसस्थानकच्या डाव्या बाजुस असलेल्या मोकळ्या जागेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्त लावण्यात आलेल्या बॅनर वरती आमच्या गावातील, वस्तीवरील इसमनामे अशोक हनुमंत निचळ, रा. अशोकनगर, भवानीनगर, सणसर, ता. इंदापुर, जि.पुणे याने दिनांक 14/04/2024 रोजी साज-या होत असलेल्या 133 व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवामध्ये अशांतता निर्माण होवुन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होण्यासाठी विचारपुर्वक, नियोजनबध्द कट रचुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न आहेत हे माहिती असुन देखील त्याने राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असे कृत्य करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनर वरती प्लॅस्टिकच्या बाटली मधुन डिझेल टाकुन तो पेटवून दिला. त्यावेळी मी व माझे सहकारी यांनी त्याला आडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याच्याकडील लोखंडी तलवारीने मला जिवे मारण्याच्या हेतुने माझ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून माझी इसम नामे अशोक हनुमंत निचळ रा. अशोकनगर, भवानीनगर, सणसर, ता. इंदापुर, जि. पुणे याचे विरुध्द कायदेशीर तक्रार आहे असे फिर्यादीत नमूद केले आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात सुरू होत असताना अशा प्रकारचे कृत्य केले जात आहे. ही निंदनीय घटना आहे, असे आंबेडकर अनुयायी सांगत आहे. यावर मराठा समाज निषेध करणार का? असे आंबेडकर अनुयायी बोलत आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांची सुद्धा आज (गुरुवारी) जयंती आहे. परंतु याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा का जाळली? यामागे मोठा कट असल्याचे लोक सांगत आहेत.

तसेच आज रमजान ईद सारखा मोठा सण आहे. त्यामुळे दंगली घडवण्याचे षडयंत्र तर नाही ना? असे लोकांकडून सांगितले जात आहे. हे कृत्य करणारा व्यक्ती अशोक हनुमंत निचळ भिक्षा मागतो व त्या व्यक्तीची मानसिकता नीट नाही असे मराठा समाजातील व्यक्तीकडून बोलले जात असल्याचे समजत आहे. त्या व्यक्ती विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व शस्त्र अधिनियम यानुसार गुन्हा नोंदवला गेला असल्याचे समजले आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »