मा.सूर्यकांतजी वाघमारे साहेब यांची पुणे जिल्हा नियोजन समितीवर निवड


पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPI (आठवले) पक्षाचे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष मा.सूर्यकांतजी वाघमारे साहेब यांची पुणे जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यात आली असून सदरील निवडीमुळे जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली साधारणतः दोन दशकापासून सूर्यकांतजी वाघमारे हे मा.रामदासजी आठवले साहेबांसमवेत एकनिष्ठेतने आणि प्रामाणिकपणे आंबेडकरी जनतेची सेवा करीत असून याच कामाची पोचपावती म्हणून त्यांची निवड झाल्याचे बोलले जात आहे.जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मिळणाऱ्या निधीचा उपयोग हा विशेषतः अनुसूचित जाती-जमातीच्या वस्त्यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी करून मावळ तालुक्यासोबतच पुणे जिल्ह्यातील इतरही तालुक्यांतील विकास कामाकरिता निधी वाटपाचा प्रयत्न हा येणाऱ्या काळात करण्यात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.तसेच पुणे जिल्हा नियोजन समितीवर निवड केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.रामदासजी आठवले साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.अजितदादा पवार साहेब यांचे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले
मा. सूर्यकांत वाघमारे साहेब यांची पुणे जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल लवकरच त्यांचा बारामती शहर आणि तालुक्यामार्फत जाहीर असा भव्य आणि दिव्य सत्कार करण्यात येणार असल्याचे मा.रविंद्र(पप्पू)सोनवणे -(युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा RPIआठवले) तसेच अभिजीत कांबळे-(बारामती शहराध्यक्ष RPI आठवले) यांच्यामार्फत सांगण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »